धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प.रा. हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरुणजी कुलकर्णी हे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रमुख उद्घाटक म्हणून माजी सैनिक संदेश महाजन, भटू पाटील, जागतिक महिला बँकेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रवीणकुमार वानखडे हे होते. मंगलाबाई गायकवाड यांनी उद्घाटन कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्या.
माजी सैनिक भटू पाटील त्यांनी उद्घाटन कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत विद्यार्थी स्वयंसेवकांमध्ये श्रमसंस्कारासोबत देशभक्ती निर्माण होते अशी आपली भावना व्यक्त केली. या उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. मिलिंद डहाळे, अजय शेठ पगारिया, सौ. नीनाताई पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भगवान महाजन, माजी सरपंच, धानोरे, श्री मिलिंद पाटील स्वप्नील महाजन,सरपंच अनोरे, रूपालीताई पाटील, प्राचार्य संजय शिंगाणे, उप प्राचार्य पंकज देशमुख, उप प्राचार्य आर.आर.पाटील,अनोरे शाळेतील मुख्याध्यापक उमेश चौधरी सर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी मिलिंद पाटील यांनी अस्तित्व फाउंडेशनद्वारे अनोरे गावांमध्ये ज्या विविध काम होणार आहेत त्याचा आढावा मांडला. स्वप्निल महाजन यांनी गावातील विकासामध्ये युवकांचा राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत कसा उपयोग करून घेता येईल, याची माहिती दिली. तर प्रवीण कुमार वानखेडे यांनी महिला बचत गटाद्वारे ग्रामीण महिलांचे आर्थिक समस्या कशा पद्धतीने दूर करता येतात त्याचे उदाहरणासहित उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव महाजन, प्रास्ताविक डॉ. अभिजित जोशी,तर आभार डॉ.ज्योती महाजन यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.