जळगाव (प्रतिनिधी) धरणगावातील एका भागात आठ आणि पाच वर्ष अशा दोन बालिकांसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ६२ वर्षाच्या वृद्धाला आज जळगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेच्या सरिता माळी, शोभा चौधरी यांच्यासह इतर महिलांनी संशयित आरोपी चंदुलाल शिवराम मराठे याला काळेफासून चोप देण्याचा प्रयत्न केला. परंतू शिवसेना महिला आघाडीला गुंगारा देण्यात पोलीस यशस्वी झालेत. दरम्यान, संशयित आरोपी चंदुलाल मराठे याला न्यायालयाने आज पुन्हा दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
दुपारी दोन वाजेपासूनच शिवसेनेच्या सरिता माळी, शोभा चौधरी यांच्यासह इतर महिलांनी संशयित आरोपी चंदुलाल शिवराम मराठे याला काळेफासून चोप देण्याच्या प्रयात्नानात होत्या. परंतू पोलिसांनी आधीच सावधगिरी बाळगली होती. त्यामुळे महिलांनी यावेळी गाडीचा पाठलाग करताच पोलिसांनी मोठ्या वेगाने वाहन कोर्टातून बाहेर काढले. त्यामुळे आंदोलन असफल झाले. यावेळी शिवसेनेच्या रनरागीनिंकडून बराच वेळ पोलीस वाहनाचा पाठलाग केला गेला, परंतू त्यांना यश आले नाही. शिवसेना महिला आघाडीला गुंगारा देण्यात पोलीस यशस्वी झाले. दुसरीकडे संशयित आरोपी चंदुलाल मराठे याला न्यायालयाने आज पुन्हा दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश आहिरे हे करीत आहे. दरम्यान, कोर्टात आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी, वासुदेव चौधरी, के.डी.चौधरी, कॉंग्रेसचे रतिलाल चौधरी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काय होतं नेमकं प्रकरण ?
धरणगावातील एका परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) याची पीठाची गिरणी आहे. याच परिसरात राहणारी एक महिला दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आली होती. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. तर दळण दळून त्यांची आई घरी निघून गेली. उशीर झाला तरी मुली घरी न आल्यामुळे आई त्यांना घेण्यासाठी परत आली. त्यावेळी चंदुलाल मराठे याने दोन्ही मुलींना आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी आणले. सहा वर्षाच्या बालिकेने चक्कीवाल्या बाबाने आपल्यालाही मांडीवर बसवले असे सांगताच आई हादरली. कामावर गेलेला नवरा घरी परतताच तिने सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फेसबुक लिंक