धरणगाव (प्रतिनिधी) येथील बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ग्रामपंचायत मतदार संघातील महायुतीचे ‘सहकार’ पॅनलचे सर्व उमेदवार तर सोसायटी मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे वृत्त आहे.
धरणगाव बाजार समितीची निवडणुक मोठ्या चुरशीची झाली होती. आज सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिला निकाल हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाजूने लागला. हमाल-मापाडी मतदारसंघातील ‘सहकार’ पॅनलचे ज्ञानेश्वर वसंत माळी हे विजयी झाले आहेत. तर आता ग्रामपंचायत मतदार संघातील महायुतीचे ‘सहकार’ पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. तर सोसायटी मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, काही धक्कादायक निकाल येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
















