धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील हनुमान नगर परिसरात विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, याप्रकरणी आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिम्पल संजय महाजन (वय २१), असे मयत विवाहितेचे नाव आहे.
नेमकी काय आहे घटना?
शहरातील हनुमान नगरमध्ये आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास डिम्पल महाजन या विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात आढळून आला. परंतू आपल्या मुलीने आत्महत्या नव्हे, तर तिचा घातपात झाल्याचं संशय मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी उपस्थित केला होता. दरम्यान, मयत डिम्पल ही 6 महिन्यांची गर्भवती होती. आणि मागील दोन वर्षांपूर्वी तिने पती निलेश सोबत प्रेमविवाह केलेला होता. दरम्यान, मयत डिम्पलचा मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना केला होता. त्या ठिकाणी मृतदेहाची ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले तर दुसरीकडे शुक्रवारी मयत विवाहिता डिम्पलच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
काय म्हटलंय फिर्यादीत !
मयत डिम्पलचे वडील जितसिंग आनंदसिंग बयस (वय ४५, रा.हनुमान नगर, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती निलेश अशोक महाजन, २) सासरे अशोक अभिमन महाजन ३) सासू- निताबाई अशोक महाजन (रा. धरणगाव) आपली मुलगी डिम्पल निलेश महाजन हीस वेळोवेळी मानसिक व शारीरीक त्रास देत शिवीगाळ व मारहान करीत होते. तर मोठी नणंद छाया उर्फ बाळा जितेंद्र महाजन ५) नणदोई भाऊ जितेंद्र उर्भ बबलू संभाजी महाजन (रा. दोडाईचा) ६) लहान नणंद वैशाली उर्फ सोनी वासुदेव देशमुख (रा. भवरखेडा) हे सुध्दा डिम्पलेचे सासु सासरे व पती यांना चिथावणी देत मारहान करण्यास सांगत होते. या सर्वांनी आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.