TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव खून प्रकरणाला गंभीर वळण ; जिनिंग मालकासह ठेकेदाराला सहआरोपी करा ; मनसेचे अॅड. जमील देशपांडे यांची मागणी !

परप्रांतियांची माहिती ठेकदार, मालकाने पोलिसांकडे नोंदवलेलीच नाही ; आणखी काही संशयित आरोपींचा शोध सुरु !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) परप्रांतीयांच्या टोळक्याने एका तरुणाचा खून केल्यानंतर एक मोठी माहिती समोर आली आहे. संबंधित जिनिंग मालकाने किंवा ठेकेदाराने पोलिसांकडे मजुरांची कोणतीही माहिती दिलेली नव्हती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. वास्तविक बघता कायद्यानुसार विहित नमुन्याच्या अर्जात परप्रांतीय मजुरांची माहिती पोलीसानांकडे नोंदविणे बंधनकारक असते. या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे एका मराठी तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे जिनिंग मालकासह ठेकेदाराला या गुन्ह्यात सहआरोपी करा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी केली आहे.

नेमकी काय आहे घटना ?
शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री किरकोळ वादातून एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये घडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. कालू सोनवणे (वय 30 रा. दहिवद तांडा, शिरपूर) या तरुणाचा परप्रांतीयांच्या टोळक्याने डोक्यात लाकडी दांडा घालून खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी रात्रभर परिसर पिंजून काढत तब्बल १७ आरोपींना ताब्यात घेतले आहे. परंतू अजूनही तीन-चार आरोपी फरार असून त्यांचा कसून शोध सुरु आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या मागावर आहेत. परंतू जिनिंग मालकासह ठेकेदाराकडे मजूरांबाबत कोणतही माहिती अधिकृत माहिती नसल्यामुळे पोलिसांना तपासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

READ ALSO

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

काय म्हणतो कायदा ?

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंनी ज्यातील परप्रांतीयांची नोंद करण्याचे पोलीस यंत्रणेला आदेश दिले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सतत परप्रांतीयांची माहिती ठेवण्याची मागणी केली होती. राज्यात परप्रांतीय कोठून येतात, ते कोठे वास्तव करतात याची कोणतीच माहिती नसते. मात्र यासंबंधी पोलीस यंत्रणेकडे रेकॉर्ड असायला हवा. अशी मागणी राज ठाकरे यांनी सतत केली होती. याच पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंनी हा मोठा निर्णय घेतला होता. यानुसार आस्थापना मालक आणि ठेकेदारांनी त्यांच्याकडील सर्व मजुरांची माहिती पोलीस विभागास देणे बंधनकारक आहे. त्या मजुराचे फोटो, पत्ता व सर्व अद्ययावत माहितीचे दस्तावेज ठेवणे आवश्यक आहे. अगदी परप्रांतीयाला घर भाड्याने दिले असेल, तर त्या भाडेकरूची सविस्तर माहिती देखील जवळच्या पोलीस ठाण्यात देणे घरमालकांना कायद्याने बंधनकारक आहे. माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कारवाईची कायद्यात तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात तसेच राज्य सरकारच्या नियमात परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याच्या नियमाची तरतूद असून परप्रांतीयांना कामावर ठेवणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुद्ध देखील कारवाईची तरतूद आहे.

अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन : अॅड. जमील देशपांडे यांचा ईशारा !

जिल्ह्यासह राज्यात गुन्ह्यांचे वाढते प्रमाण कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.केंद्राच्या राज्य स्थलांतर कायद्याअंतर्गत तसेच राज्यातील परप्रांतीय व्यक्तींच्या नोंदी करण्याच्या कायद्याची ठोस अंमलबजावणी व्हावी. तसेच धरणगावच्या प्रकरणात जिनिंग मालकासह ठेकेदाराला या गुन्ह्यात सहआरोपी करावे,अशी आमची मागणी आहे. कारण या प्रकरणात एका मराठी तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. गुन्हा दाखल न झाल्यास आम्हाला मनसे स्टाईल आंदोलन करावे लागेल, असा ईशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी दिला आहे. तसेच याबाबत लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन दिले जाणार असल्याचेही सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

संतापजनक : ९ वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्याचा प्रयत्न ; जळगावात ४५ वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पादचारी तरुणाला जखमी करून हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीवरील चोरटे पसार

February 16, 2022

धक्कादायक : भुसावळात पोलिस चौकी परिसरात एकाचा खून !

May 8, 2021

कपल्सच्या अश्लील चाळ्यांना कंटाळून चक्क मुंबईतल्या या भागात ‘नो किसिंग झोन’ चे फलक !

August 2, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 9 एप्रिल 2024 !

April 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group