धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू देवराम शिरसाठ यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आज विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी जाहीर केली आहे.
डॉ. बापू शिरसाठ यांनी डॉ. के.के.अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कथाकार योगिराज वाघमारे यांच्या कथांचा साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. आज आभासी पद्धतीने झालेल्या मौखिक परीक्षेत ( व्हायवा) त्यांना पीएचडी ही पदवी जाहीर करण्यात आली. पी.आर.हायस्कूलमध्ये आता पर्यंत तीन शिक्षकांना पीएचडी ही साहित्यातील उच्च पदवी संपादन करण्याचा मान मिळाला होता. शाळेच्या शिरपेचात पुन्हा चौथ्यांदा हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. याबाबत डॉ.बापू शिरसाठ यांचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांच्यासह सहकारी शिक्षक, संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.














