धरणगाव (प्रतिनिधी) लांबच्या नात्यात असलेल्या एका शाळकरी मुलीवर ती १६ वर्षांची असताना अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल धरणगाव येथील मोहित चव्हाण याच्यावर ‘पॉक्सो’खाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी आरोपीला तिच्याशी लग्न करणार का? अशी विचारणा केली, त्यामुळे आज देशभरातील माध्यमांचे या सुनवाईकडे लक्ष वेधले गेले.
धरणगाव येथील पारधीवाडयातील महादेवाच्या मंदिराजवळ राहणार्या मोहित सुभाष चव्हाण आरोपीच्या वकिलाला सरन्यायाधीशांनी वरील प्रश्न विचारला. त्यावर वकिलाने, मी (आरोपीला) विचारून सांगतो, असे उत्तर दिले. यामुळे देशभरातील माध्यमांचे याकडे आज लक्ष गेले. या प्रकरणातील आरोपी मोहित २४ वर्षांचा असून महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीत (महाजेनको) तंत्रज्ञ म्हणून नोकरीस आहे. सन २०१९ मध्ये लांबच्या नात्यात असलेल्या एका मुलीवर ती १६ वर्षांची असताना अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल मोहित याच्यावर ‘पॉक्सो’खाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मुलीने घटनेच्या साधरण दोन वर्षांनंतर पोलिसांत फिर्याद नोंदविली होती. त्यावेळी आरोपीच्या आईने या मुलीला सज्ञान झाली की तिचे तुझ्याशी लग्न लावून देईन. तसेच तिला मी सून म्हणून स्वीकारेन, पण माझ्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार करू नका, असे ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून दिले होते. परंतु लग्न न झाल्यामुळे पीडिता कोर्टात पोहोचली.
आज सुनवाई दरम्यान, सरन्यायाधीशांनी आरोपीला ‘तू तिच्यासोबत लग्न करणार का?’ अशी विचारणा केली असता आरोपीच्या वकिलाने यासंबंधी सूचना घेऊ, असं उत्तर दिलं. यावर सरन्यायाधीश म्हणाले कि, “याचा विचार मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी व्हायला हवा होता. तू सरकारी कर्मचारी आहेस हे तुला माहिती होतं. सरन्यायाधीश पुढे हे सुद्धा म्हणाले, आम्ही तुला लग्नासाठी जबरदस्ती करत नाही आहोत. पण जर करण्याची तयारी असेल तर आम्हाला कळवावं. नाही तर आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करत आहोत असं सांगशील. त्यावर मोहितने आपण आपली सरकारी नोकरी गमावू शकतो असे सांगण्यात आले. आरोपीचा हा नकार ऐकल्यावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास आपण उत्सूक नसल्याचे सांगून याचिका मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार याचिका मागे घेण्यात आली. मात्र आरोपी मोहितला सक्षम न्यायालयाकडे नियमित जामिनासाठी अर्ज करता यावा यासाठी त्याच्या संभाव्य अटकेस आठ आठवडे स्थगिती दिली गेली. तसेच सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिकाकर्त्याला विचारले कि, जर तू लग्न करणार असशील तर आम्ही मदत करु शकतो. जर नाही, तर तुझी नोकरी जाईल आणि तुला जेमलध्ये जावं लागेल. मुलीचा छळ आणि बलात्कार करण्याआधी याचा विचार करायला हवा होता,असे देखील सुनावले.
विशेष म्हणजे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश न्या. मंगेश पाटील यांनीही हाच प्रश्न युक्तिवाद पूर्ण झाल्यावर मोहितला विचारला होता. त्याच्याकडून नकारार्थी उत्तर मिळाल्यावर त्यांनी मोहितचा अटकपूर्व जामीन रद्द करम्याचा निकाल दिला होता. तत्त्पुर्वी आरोपीच्या वकिलाने आपण यासंबंधी चर्चा करुन निर्णय कळवू असे सांगितले. त्यानंतर आरोपीने सांगितले कि, “मला आधी लग्न करण्याची इच्छा होती. पण तिने नकार दिला. आता मी विवाहित असल्याने लग्न करु शकत नाही”. तसेच यावर अजून खटला सुरु आहे आणि अजूनही माझ्यावरचे आरोप सिद्ध नाही झाले आहेत. मी सरकारी कर्मचारी असून जर अटक झाली तर आपोआप निलंबित होईन, असेसुद्धा आरोपीने कोर्टात सांगितले आहे.
त्यावर सरन्यायाधीशांनी सांगितले, “म्हणूनच आम्ही तुला हा पर्याय दिला आहे. आम्ही चार आठवड्यांसाठी अटक स्थगित करत आहोत. नंतर तू नियमित जामीनासाठी अर्ज करु शकतोस, याअगोदर ट्रायल कोर्टाकडून आरोपीला अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. पण उच्च न्यायालयाकडून मात्र ते फेटाळण्यात आले. दरम्यान, आरोपी मोहित २४ वर्षांचा असून महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीत (महाजेनको) तंत्रज्ञ म्हणून नोकरीस आहे. अटक होऊन ४८ तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत राहिला तर त्याला नोकरीतूनही आपोआप निलंबित केले जाईल. हे टाळण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे.