धरणगाव (प्रतिनिधी) येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त १ वर्षांपासून धरणगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठोबारायांच्या दर्शनासाठी पायी दिंडी वारी काढली जाते. यावर्षी ३१ मे ते २ जुलै या कालावधीमध्ये पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
या पायी दिंडी दरम्यान २४ ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था आहे. ठिकठिकाणी दिंडीतील वारकऱ्यांना नाश्ता, भोजन व रात्री झोपण्याची व्यवस्था केलेली आहे. यावर्षी २९ जूनला आषाढी एकादशी असून त्याच्या दोन दिवस आधी पायी दिंडी पंढरपूर येथे पोहोचेल. १ तारखेला काल्याचे कीर्तन झाल्यानंतर पंढरपूरहून दिंडीचे प्रस्थान होणार आहे. भाविकांनी दिंडीत सहभाग घ्यावा, असे आवाहन माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महामंडलेश्वर भगवानदास महाराज यांनी केले आहे.