धरणगाव (प्रतिनिधी) विविध मागण्यांसाठी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धरणगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दि. ८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी संघटनेचे अध्यक्ष जी.डी.पाटील, प्रभाकरअण्णा पाटील तसेच निलेश ओस्तवाल यांच्या नेतृत्वात संघटनेकडून नितीन देवरे यांना निवेदन देण्यात आले. दि. ७,८,९ फेब्रुवारी या तीन दिवशी स्वस्त धान्य दुकाने बंद ठेऊन त्याचाच एक भाग म्हणून दि. ८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी संघटनेचे रविंद्र कंखरे, मोतीअप्पा पाटील बाबुलाल सिताराम पाटील,सुधाकर पाटील, अरविंद ओस्तवाल, अमृत पाटील,अमोल पाटील,कैलास पाटील, लोटन गुलाबराव पाटील,छोटू ओंकार पाटील,वना भाऊ कोळी,संजय गुप्ता,विनोद गुप्ता,संजय भालेराव,निलेश बाजपइ,आर.एस.निकम, दीपलक्ष्मी म ब गट,गणेश पाटील नारणे,दिनेश प्रताप कोळी,एस एल पाटील,ज्ञानेश्वर सोनवणे असे असंख्य दुकानदार बांधव उपस्थित होते. सर्वात शेवटी अमोल पाटील यांनी आभार मानले.