चोपडा (प्रतिनिधी) शहरातील महावीर नगर परिसरातील साईनाथ महेश्वर महादेव मंदिराला दातृत्वशाली व्यक्तीमत्व राजेंद्र यशवंत बडगुजर यांनी डिजीटल एलईडी बोर्ड सप्रेम भेट देऊन भक्तगणांच्या मनात आदर्श निर्माण केला आहे.
मंदिर प्रांगणात आयोजित कार्यक्रमात माजी जे.डीसी.बॅंक संचालिका सौ.इंदिराताई पाटील व श्रीमती सुमनताई यशवंत बडगुजर यांच्या शुभहस्ते हस्ते डिजिटल बोर्ड फलक अनावरण करण्यात आले. या डिजिटल बोर्डासाठी पुणे येथील मधुरा इंटिरियर अँड कन्स्ट्रक्शन या फर्मने मोलाचे योगदान दिलेले आहे.
यावेळी राजेंद्र यशवंत बडगुजर सुनील बडगुजर औरंगाबाद, विनोद बडगुजर ,पत्रकार महेश शिरसाट, पत्रकार लतीष जैन, फुलचंद चौधरी, कैलास बडगुजर ,संदीप सावडळेसर, रवींद्र बडगुजर, श्रीराम बडगुजर सिंदखेडा, संजय बडगुजर सिंदखेडा,गौरेश बडगुजर, विनोद पाटील, सुनील महाराज, संजय जोशी, ऋषिकेश भावे ,सुरेखा मोतीराम महाजन, माधुरी बडगुजर, सरला बडगुजर, भारती बडगुजर ,सरिता बडगुजर,भावना भावसार, रंजना बडगुजर, ममता चौधरी, मंजुषा कुलकर्णी ,कविता भावसार, पूजा सिंधी, शितल महाजन आदी उपस्थित होते.यानंतर महाप्रसादाचा लाभ कॉलनी परिसरातील रहिवासींनी मोठ्या संख्येने घेतला.