नशिराबाद (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे आज दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मंचावर संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अध्यक्ष जनार्दन माळी, सचिव मधुकर चौबे, संचालक विनायक वाणी, राजेश पाटील, माध्यमिक नव निर्वाचित मुख्याध्यापक सी.बी. अहिरे, पर्यवेक्षक बी आर खंडारे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्वप्रथम नव निर्वाचित मुख्याध्यापक सी बी अहिरे यांचे पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ, सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यात संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
तद्नंतर मंचावरील मान्यवरांच्या व सर्व बाल विद्यार्थांच्या हस्ते दीप- प्रज्वलन करून दिप उत्सवला सुरूवात करण्यात आली व सर्व शाळा ही दिव्यांनी लख -लखीत करण्यात आली. सर्वांना गोड लाडू खाऊ वाटप म्हणून करण्यात आला. या उत्साहात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दिप उत्सवाचा आनंद साजरा केला. या कार्यक्रमाचे नियोजन श्याम कुमावत यांनी केले तर सूत्र संचालन राजेंद्र पाचपांडे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.