जळगाव (प्रतिनिधी) एन मुक्टो केंद्रीय कार्यकारिणीच्या शिष्टमंडळाने एन मुक्टोचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्या नेतृत्वात काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात माननीय सहसंचालक साहेब उच्च शिक्षण विभाग जळगाव यांच्या दालनात मागण्यांचे निवेदन दिले. यात प्रामुख्याने ७१ दिवसांच्या परीक्षा बहिष्कार कालावधीतील वेतन अदा करण्यासंदर्भातील अडचणी व त्या संदर्भात उद्भवलेले प्रश्न यांची चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच ते वेतन अदा करण्यात येणार आहे.
सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच ते वेतन अदा करण्यात येणार आहे व त्या कालावधीतील महागाई भत्ता ७२ टक्के अधिक आठ टक्के फरक याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच सेवानिवृत्त प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात देखील सकारात्मक भूमिका घेऊन रिटायरमेंटच्या वेळेला क्रॉस चेक ने रक्कम अदा करण्यात येईल सोबत प्रोफेशनल टॅक्स कापून देण्यात येईल असे आश्वासन माननीय सहसंचालकांनी दिले. तसेच वर्कलोड कॅल्क्युलेशन पुन्हा नव्याने होण्याच्या संदर्भात देखील सकारात्मक चर्चा झाली आणि सेवानिवृत्त होताना अनेक प्राध्यापकांना प्रथम नेमणुकीच्या वेळेची जाहिरात मागितली जाते, असे न करता ४१५ (१) (२) (३) यासंदर्भात विविध नेमणुकांसाठी केवळ तांत्रिक अडचण असल्याशिवाय त्यासाठी अडवणूक केली जाणार नाही हे देखील त्यांनी मान्य केले. स्टेप अप संदर्भात देखील सर्व प्रकरणे लवकरात लवकर माहिती संकलित करून ती सर्व प्रकरणे दि. ३१ मार्च २०२१ पूर्वी निकाली काढण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविलेली आहे. ज्याच्या CAS प्रमोशनच्या संदर्भात अनेक संस्थांमध्ये मॅनेजमेंटमधील वाद असतील किंवा इतर कोणत्याही कारणास्तव पदोन्नती थांबलेली आहे. सहयोगी प्राध्यापक या पदावरील ज्यांचे प्रमोशन हे लांबणीवर पडले आहे. त्यात काय मार्ग काढता येईल यासंदर्भात देखील त्यांनी सकारात्मक चर्चा केली. आणि संघटनेने संघटनेच्या स्तरावर काय करावं या संदर्भात देखील भूमिका त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे. या बैठकीला केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष अनिल पाटील, डॉ . के. जी. कोल्हे, डॉ. जगदीश पाटील डॉ. प्रभाकर महाले, नितीन बाविस्कर, प्रा. डॉ . वले, प्रा. डॉ . महेंद्र सोनवणे, प्रा. डॉ. प्रवीण बोरसे, डॉ. डी .पी .पवार, डॉ. प्रवीण महाजन, पद्माकर पाटील, डॉ. दिलीप चव्हाण आणि डॉ. अरविंद राऊत हे उपस्थित होते. डॉ. महाले यांनी आभार व्यक्त केले.