सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) दिशा सालियन या एका भारतीय, महाराष्ट्रीय मुलीवर अत्याचार केला आहे, हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) तिथं उपस्थित होते, तुला सोडणार नाही. आता सत्ता भाजप आणि शिंदे गटाची आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी दिला आहे. यापूर्वीही नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर या प्रकरणावरुन आरोप केलेले आहेत. (Sushant Singh Disha Salian Case). दरम्यान, या प्रकरणी आदित्य ठाकरे कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच न्यायालयात जाणार असल्याचं कळतेय.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. तिने आत्महत्या केली की तिच्यासोबत घातपात घडला? याबाबत अद्याप संभ्रम आहे. दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतसिंह राजपूतही राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा हात आहे, असा आरोप नारायण राणे यांनी यापूर्वी केला होता. यानंतर आता राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. दिशा सालियनवर तू अत्याचार केला. तिची हत्या केली, तुला सोडणार नाही, असं विधान नारायण राणेंनी केलं आहे. ते सिंधुदुर्ग येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
नारायण राणे पुढे म्हणाले की, “सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानचं नाव आलं की आदित्य ठाकरे चवताळले. आज नाहीतर उद्या… पण तुला तुरुंगात नक्की पाठवणार. दिशा सालियन या एका भारतीय आणि महाराष्ट्रीयन मुलीवर तू अत्याचार केला आहे, तू हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते. तुला सोडणार नाही. आता भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता आहे, एवढं लक्षात ठेवा” असा गंभीर इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. यापूर्वीही नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर या प्रकरणावरुन आरोप केले होते.
बदनामी करणाऱ्यांविरोधात आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणी टीकेचा सामना करावा लागत आहे. भाजप नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांना या प्रकरणावरुन वारंवार टार्गेट केलं जात आहे. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांकडून जबाबदार धरले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी याआधी यावर कोणताही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र आता ते आरोप करणाऱ्यांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसतेय. ते आता याप्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं समोर आलं आहे.