मुक्ताईनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र विरोधी भुमिका घेणाऱ्या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा लेखाजोखा मांडणाऱ्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रकाशित ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आकाशात काळे फुगे सोडून महायुती सरकारचा निषेध केला.
महायुती सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महिला विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्याचा दावा केला जात आहे. मात्र या योजना फोल ठरल्या. महायुती सरकार सहकार क्षेत्र, कर्जमाफी, पिकांचा हमीभाव, पीक विमा, दुध अनुदान बळीराजाच्या आत्महत्या, सोयाबीन व कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासह वाढती महागाई, रोजगार, महिला सुरक्षा सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात महापुरुषांचा अवमान होतो आहे. या महाराष्ट्रद्रोही सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील या परिस्थितीवर सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीतर्फे मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विरोधी भुमिका घेणाऱ्या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा लेखाजोखा मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रकाशित ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले तसेच आकाशात काळे फुगे सोडून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रोहिणी खडसे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राची अवहेलना करून महाराष्ट्राला झुकवण्याचे काम केले आहे. राज्यातील महायुती सरकारने राज्याची अस्मिता केंद्र सरकारकडे गहाण ठेवण्याचे पातक केले आहे. सत्ताधाऱ्यांनी महागाई आटोक्यात आणण्याचे, रोजगार देण्याचे, शेतमालाला हमीभाव देण्याचे, महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचे आश्वासन देऊनही केंद्र राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत, सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यामुळे पुतळा कोसळून छत्रपती शिवरायांचा अवमान झाला आहे. या सत्ताधाऱ्यांच्या काळात महापुरुषांचा अवमान होतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची मान शरमेने खाली झुकली आहे. सत्तेची मग्रुरी असणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना जनसामान्यांच्या प्रश्नांशी काही घेणे देणें नाही या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असून जनता त्यांना निश्चित धडा शिकवेल असा विश्वास व्यक्त केला
तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महायुती सरकारचे काळे कारनामे जनते पर्यंत पोहचवण्याचे रोहिणी खडसे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आवाहन केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांनी महायुती सरकारच्या कारभारावर कठोर शब्दात टिका करून येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र विरोधी भुमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन केले. यावेळी मनोहर खैरनार यांनी राज्य केंद्र सरकारच्या कारभारावर टीकास्त्र डागले.
यावेळी उ बा ठा गटाचे मनोहर खैरनार, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटिल, दिलीप पाटिल, विलास धायडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटिल, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, लताताई सावकारे, भागवत पाटिल, प्रेमचंद बढे, अनिल पाटील, प्रविण पाटिल, बापु ससाणे, संजय कोळी, साहेबराव पाटिल, सोनु पाटिल, प्रविण दामोदरे, विनोद काटे, नंदकिशोर हिरोळे, योगेश काळे, राहुल पाटिल, निलेश भालेराव, भुषण पाटिल, रउफ खान, अज्जू खान, सय्यद फिरोज, जितेंद्र पाटिल, सुभाष खाटीक, रफिक मिस्त्री, हरिभाऊ कवळे, भैय्या पाटिल, बाळा चिंचोले आणि पदाधिकारी उपस्थित होते.