धरणगाव (प्रतिनिधी) आज येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माजी विधानसभाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज झोपडपट्टी परिसरात फळ व मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रतिलाल चौधरी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सम्राट परिहार, शहर अध्यक्ष राजेंद्र न्हायदे, तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, जिल्हा रेशनिंग समितीचे सदस्य बंटी पवार, नंदलाल महाजन, सुनील बडगुजर, सरचिटणीस रामचंद्र माळी, विकास लांबोळे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल मराठे, सरचिटणीस योगेश येवले व कार्यकर्ते उपस्थित होते.
















