TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अ.भा.नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे रंगकर्मी पुरस्कारांचे वितरण संपन्न

ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्काराने चिंतामण पाटील तर युवा रंगकर्मी पुरस्काराने विशाल जाधव यांचा गौरव

vijay waghmare by vijay waghmare
August 24, 2025
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

जळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे दिला जाणारा रंगकर्मी पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांना तर युवा रंगकर्मी पुरस्कार विशाल जाधव यांना प्रदान करण्यात आला. रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. याच संघटनेची जळगाव जिल्हा शाखा २०१९ पासून अस्तित्वात आली. गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्हा शाखेतर्फे रंगकर्मी पुरस्काराने स्थानिक कलावंतांचा गौरव करण्यात येतो.
हे रंगकर्मी पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष अॅड.संजय राणे यांच्या हस्ते दोन्ही रंगकर्मींना प्रदान करण्यात आले. मानपत्र, रोख रुपये पाच हजार व शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी रंगमंचावर सहकार्यवाह योगेश शुक्ल, नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे, समन्वयक पवन खंबायत, ज्येष्ठ रंगकर्मी पियुष रावळ, ॲड.नितीन देशमुख, पियुष नाशिककर, उमेश घळसासी आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कलावंत चिंतामण पाटील हे गेल्या पाच दशकांपासून जळगावच्या रंगभूमीवर कार्यरत असून, त्यांनी महाविद्यालयीन काळापासून जळगावची रंगभूमी गाजवली आहे. त्यांनी २६ जानेवारी १९७९ रोजी स्थापन केलेल्या खान्देश नाट्य प्रतिष्ठान या संस्थेला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. आजवर सादर केलेल्या सरहद्द, सापळा, मध्यरात्रीचा सूर्य, हुंडेकरी, रंग उमलत्या मनाचे, दीपस्तंभ, माणूस एके माणूस, आनंदमयी, सावल्या यासह अनेक पुरस्कारप्राप्त एकांकिका व नाटकांचे सादरीकरण जळगावचे नाव राज्यभरात पोहचविलेले आहे.
तसेच युवा रंगकर्मी पुरस्कारप्राप्त रंगकर्मी विशाल जाधव यांनी आपली अभिनय कारकिर्द शाहीर विनोद ढगे यांच्या पथनाट्य पथकापासून सुरु करुन नंतर विविध संस्थांच्या एकांकिका व नाटकातून अभिनय करत अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यानंतर स्वतःची समर्थ बहुउद्देशीय संस्था स्थापन करुन राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा, महावितरण नाट्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धांतून यश संपादन केले आहे.
‘नाट्य परिषद करंडक’ प्राथमिक फेरी संपन्न
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित… शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी दि. २३ रोजी नूतन मराठा महाविद्यालयाच्या नाट्य सभागृहात राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सव म्हणजेच ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आला होता.
जळगाव जिल्ह्यातून ९ एकांकिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. दि. २३ ऑगस्टला सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. उद्‌घाटन झाल्यानंतर रंगशाळा जळगाव निर्मित – सख्खे शेजारी, दीपरंग भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगरची – मानस, नाट्यरंग जळगाव यांची – गाईड, नूतन मराठा महाविद्यालय नाट्यशास्त्र व सांस्कृतिक विभाग जळगाव यांची- सुबन्या आणि…, समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बुद्रूक, ता.एरंडोल यांची – काजव्यांचे स्वप्न, समर्थ कला बहुउद्देशीय संस्था जळगाव यांची- सांबरी, आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव यांची – दिशा, भाग्यदीप थिएटर्स जळगाव यांची- ओजस्वी या एकांकिका सादर करण्यात आल्या.
ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अश्या दोन फेऱ्यांमध्ये होणार असून, या प्राथमिक फेरीतून पारितोषिकप्राप्त एका एकांकिकेची निवड अंतिम फेरीसाठी होणार आहे. अंतिम फेरी मुंबई येथे १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा – माहीम, मुंबई येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य परिषदेकडून नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व शहरातील कलावंतांनी परीश्रम घेतलेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDistribution of Rangkarmi Awards by A.B.A. Natya Parishad Jalgaon District Branch

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा येथील महाविद्यालयास ५८ लाखांचे अनुदान ; अनुदानामुळे संशोधनास मिळणार चालना !

December 23, 2022

जांभोरा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रा.पं. कार्यालयासह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन संपन्न !

October 15, 2024

लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा !

November 6, 2024

शिवसेना आमदारांच्या बंडाला उद्धव ठाकरेच जबाबदार : गिरीश महाजन 

July 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group