धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील परिसरातील पिंपळे व चोपडा रस्त्यावरील पावरा समाजातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेशातील बुटांचे वाटप पालिकेचे माजी गटनेते विनय भावे उर्फ पप्पू भावे यांच्याकडून नुकतेच करण्यात आले.
सदर विद्यार्थ्यांसाठी देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने बालसंस्कार केंद्र चालवले जाते. त्यांच्याच माध्यमातून या विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाप्रती जागृत करून त्यांचे नाव शाळेत दाखल करून घेतले आहेत. तसेच विविध दात्यांच्या माध्यमातून त्यांना सर्व शैक्षणिक साहित्य कसे देता येईल?, असा प्रयत्न समितीचा असतो.
गेल्या काही दिवसापूर्वी जीवनआप्पा बयस यांनी या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिले होते. तर यंदा गणवेश व बुट घेतेवेळी विद्यार्थ्यांमध्ये खूप आनंद व उत्साह जाणवत होता. वस्तीतील पालकांनी समितीचे जीवनआप्पा, विनय भावे यांचे आभार मानले. सदर प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विलासभाऊ महाजन, कैलास माळी, वाल्मीक पाटील , प्रशांत देशमुख, चेतन पाटील हे उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी हरिओम फुट वेअरचे महेश क्षत्रिय यांचे सहकार्य लाभले.