जळगाव(प्रतिनिधी) : ९ ऑक्टोबर रविवार हा संपूर्ण भारतात अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांची पुण्यतिथी म्हणून ईद-ए-मिलाद हा उसत्व साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या औचित्य साधून जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने विविध समाजातील १० गरजू महिलांना व जार्जिश फाउंडेशन या सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेस दोन शिलाई मशीनचे वाटप धर्मगुरु मुफ़्ती मुफ़्ती हारून नदवी,कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चाँद अमिर, बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व मनियार पंच कमेटिचे अब्दुल रउफ रहीम यांच्या हस्ते कांताई सभागृहात करण्यात आले.
सा.ने.गुरुजी लिखित इस्लामी संस्कृती पुस्तक भेट
प्रेषित हजरत मोहम्मद (स)यांच्या जीवन चारित्र्यवावर सा ने गुरुजी यांनी अत्यंत चांगल्या मराठी भाषेत लिहले पुस्तक जळगाव शहरात व शिरसोली येथे आमच्या हिंदू बांधवांना ही पुस्तकें मनियार बिरादरी तर्फे भेट म्हणून देण्यात आली. याची सुरवात शिरसोली तुन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिरसोली गावचे सरपंच भिलाल अप्पा भील,वरिष्ट डॉ एल.डी,पाटील ,माजी सरपंच प्रदीप पवार यांचे पासून करण्यात आली. जळगाव शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या हिंदू बांधवांना सुद्धा हे पुस्तक मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या हस्ते देण्यात आले.