चोपडा (प्रतिनिधी) येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने असाह्य व गरीब विध्यार्थ्याना भाऊबीज व संघटनेचे राज्य सचिव दिपक चोपडा यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई व फराळ वाटप करण्यात आले.
येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने असाह्य व गरीब विध्यार्थ्याना भाऊबीज निमित्त फराळ वाटप करायचे आहे, असे आवाहन सोशल मीडियावर केले होते. त्या आवाहनवरून समाजातील अनेक दानदात्यांनी भारतीय जैन संघटनेवर विश्वास ठेवत आर्थिक मदत केली. सामाजाच्या सहकार्याने भारतीय जैन संघटना असा कार्यक्रम घेत असते. जवळपास 200 परिवारा पर्यंत मिठाई व फराळ संघटनेने पोहचवली. यावेळी उघड्यावर असलेले निरागस मुलांना फराळ भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्या सारखा होता. त्यामुळे संघटनेच्या सदस्यांचे देखील चेहऱ्यावर समाधान दिसत होते. तसेच बारामती अॅग्रोच्या ऊस तोड कर्मचाऱ्यांना देखील मिठाई व फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी बारामती ऍग्रोचे मुख्य शेतकी अधिकारी आर.व्ही.देसले,सुपरवायझर श्रीराम पाटील, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव गौरव कोचर, कोष्याध्यक्ष अभय ब्रम्हेचा, जेष्ठ सदस्य दिनेश लोडाया, विपुल छाजेड, चेतन टाटीया,आदेश बरडीया, विभागीय उपाध्यक्ष लतीश जैन आदी हजर होते.