जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँक निवडणुकीसाठी अनुसूचित जमातीतील उमेदवार नामदेव भगवान बाविस्कर यांची माघार निवडणुक अधिकारी यांनी वेळे अभावी स्विकारली नाही. त्यामुळे नामदेव बाविस्कर यांनी राखीव मतदार संघातील अनुसूचित जमातीतील उमेदवार शामकांत बळीराम सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
माझी उमेदवारी जिल्हा बँकेसाठी (राखीव) अनुसूचित जमातीत उमेदवारी केलेली होती. परंतु माघारीस आलो असता वेळे अभावी (टाईम ३.०५) वाजता माझी माघार निवडणुक अधिकारी यांनी स्विकारली नाही. तरी या राखीव मतदार संघातील अनुसूचित जमातीतील उमेदवार शामकांत बळीराम सोनवणे यांना जाहिर पाठींबा देत असून स्वखुशीने या निवडणुक काळात आपले बहुमोल मतदान शामकांत बळीराम सोनवणे यांना मतदान करावे, असे आवाहन नामदेव भगवान बाविस्कर यांनी केलं आहे. दरम्यान याबाबतचे पत्र जिल्हा बँक संचालक संजय पवार यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केले आहे.