जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या कार्यकारी मंडळाची मुदत ही में २०२० मध्ये संपली होती. ठराव झाल्यानंतर ६ महिन्यांचा आत निवडणूक न झाल्यास प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली होती तेथूनच पुढे सुरू होणार आहे. यामुळे जुन्या ठरावांप्रमाणेच निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यशवंत गिरी यांनी माध्यमांना दिली आहे.
जिल्हा बँकेच्या मे २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्यावर्षी जिल्ह्यातील ५३३ विकास सोसायट्या व इतर संस्थाचे ७८१ असे एकूण १ हजार ३१४ संस्थांचे ठराव करण्यात आले होते. मात्र, आता जिल्हा बँकेची निवडणूक ही जुन्या ठरावाप्रमाणेच होणार असल्याची माहिती सचिव यशवंत गिरी यांनी दिली आहे. जिल्हा बँकेचे अनुभवी संचालक हे ठराव रद्द होत असतात. मे २०२० मध्ये अपेक्षित निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विकास सोसायट्यांकडून ठराव करून घेण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यातच ही प्रक्रिया पार पडली होती. इच्छुकांनी ठरावधारकांवर चांगलाच पैसा खर्च केला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
















