TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गरबा, दांडिया ऐवजी आरोग्य विषयक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आवाहन

रावण दहन कार्यक्रमास अटींवर परवानगी, मात्र आगमन व विसर्जन मिरणूका काढता येणार नाही

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्साहात परंतु साधेपणाने साजरा करावा. या उत्सवात गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रमास प्राधान्य देऊन शासनाच्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेबाबत जनजागृती करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले असून याबाबत मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत.

सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोणातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक मंडळानी महानगरपालिका/नगरपालिका/स्थानिक स्वराज्य प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत, घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट साध्या पध्दतीने करावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता चार फुट व घरगुती मूर्तीची उंची दोन फुटाची मर्यादा असावी. देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातु, संगमरवर आदि मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

उत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास स्वीकार करावा, नागरीकांना जबरदस्ती करु नये. या उत्सावात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शीत करण्यास पसंती द्यावी, यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी या माहिमेची जनजागृती करावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम जसे-रक्तदान शिबिरांचे आयेाजन करण्याचे करावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबतही जनजागृती करावी.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन करण्यात यावी, देवीच्या मंडपात प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत ब्रेक द चेन अंतर्गत देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आरती, भजन, किर्तन आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. मंडपात खाद्यपदार्थ, पेयपानाची व्यवस्था करु नये. देवीच्या आगमन व विसर्जन मिरणवणूका काढू नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करावी. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. घरगुती व सार्वजनकि नवरात्रौत्सवाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर मूर्ती विर्सजन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई राहील.

दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा, रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील, प्रेक्षक बोलवू नये. त्यांना समाज माध्यमातून थेट प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था करावी.

या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे पालन करावे. सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल. असेही अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

नशिराबादला अजिंक्य महिला मंडळाची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणी टंचाईच्या बाबतीत पालिका प्रशासन धरणगावकरांच्या भावनांशी खेळतेय का ?

October 20, 2022

फक्त शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावर टीका नसून सकल दिव्यांगाचा अपमान; दंडावर काळी फित बांधून खोत यांचा धरणगावात निषेध : राजेंद्र वाघ !

November 6, 2024

काळजी घ्या…जिल्ह्यात आज आढळले ६ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

January 1, 2022

शासकीय महिला रुग्णालयाच्या इमारतीचे साहित्य लांबविले, चोरटे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात !

March 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group