नाशिक (प्रतिनिधी) कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंधाचे आदेश जारी केले असून, सदर निर्बंध ५ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे १२ एप्रिल २०२१ रोजी होणारा विभागीय लोकशाही दिन होणार नसल्याचे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे करण्यात येते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सदरचा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.
नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.