जळगाव (प्रतिनिधी) शहरात मंजूर झालेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत मंजूर १७ दवाखाने तातडीने सुरू करण्याबाबत आज मनसेने महापालिकेच्या आयुक्तांना दिले.
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साधारण एक वर्षापुर्वी जळगाव महानगरपालीकेने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजने अंतर्गत शहरात १७ ठिकाणी दवाखाने सुरू करण्याबाबत महासभेत ठराव केला आहे. त्यामधील एकमेव दवाखाना शिव कॉलनीत सुरू झाला असुन उर्वरीत १६ दवाखाने तातडीने सुरू करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत प्रत्येक १५ हजोर लोकवस्तीला एक दवाखाना असावा असे अपेक्षित आहे. महानगरपालीका प्रशासनाने शिवाजी नगर, राधाकृष्ण नगर, १५ नं. शाळा, आराध्य पार्क, मेहरूण, रामेश्वर कॉलनी, मनपा शाळा क्र. ५०, कांचन नगर, खेडी, जोशी पेठ, सम्राट कॉलनी अशा ठिकाणी दवाखाने मंजूर केले आहेत.
शहरातील नागरीक आरोग्याच्या लाभाशी संबंधित हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना अतिशय उत्तम असुन त्यामुळे गोरगरीब रुग्णांना लाभ होणार आहे. या दवाखान्यात ३० प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या, १०५ प्रकारची औषधी, ६६ प्रकारची वैद्यकीय उपकरणे, एक वैद्यकीय अधिकारी, अधिपरीचारीका, औषध निर्माण अधिकारी, सफाई कर्मचारी व अटेन्डन्ट असा कर्मचारी वर्ग असणार आहे. मात्र एवढ्या चांगल्या योजनेचा का खोळंबा होत आहे हे समजण्यापलीकडे आहे.
कर्मचारी वर्गाची भरती !
दवाखान्याकरीता एक वर्षापुर्वी २४ आरोग्य सेवकांची परीक्षेद्वारा निवड करण्यात आली असुन ते दवाखाने सुरू होण्याची प्रतिक्षा करीत आहे. तसेच आठ परीचारीकेची निवड करण्यात आली असुन कामाची प्रतिक्षा करीत आहेत. शासनाने प्रत्येक दवाखान्याकरीता ४९ लाख रू. चा निधी उपलब्ध करून दिला असुन दवाखाने सुरू न झाल्यास ३१ मार्च २०२४ नंतर सदर निधी परत जावु शकतो अशी दाट शक्यता आहे.
शहरात ४० दवाखाने होऊ शकतात !
शासनाच्या नियमानुसार प्रत्येक १५००० लोकसंख्येस एक दवाखाना अशी संकल्पना आहे. त्यानुसार जळगांव शहरातील लोकसंख्या ६ लाखाच्या आसपास आहे त्यामुळे ३५ ते ४० दवाखाने सुरू करता येतील. शहरातील तांबापुरा, उस्मानिया पार्क, फातेमा नगर, हरी विठ्ठल नगर, वाघ नगर, निमखेडी, खोटेनगर, आहुजा नगर, निमखेडी, अयोध्या नगर, सदोबा नगर, तुकाराम वाडी, कासमवाडी या परीसरात दवाखाने सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
जळगाव शहरात शिवकॉलनी परीसरात एकमेव सुरू करण्यात आलेला दवाखाना रात्री अनेकवेळा बंद असतो. सदर दवाखान्याची वेळ ही दुपारी २ ते रात्री १० पर्यंत आहे. मात्र १० पर्यंत सदर दवाखाना सुरू नसतो असेही निवेदनात म्हटले आहे.
महानगरपालीका प्रशासनाने काय करावे !
१) महासभेने मंजूर केलेले १७ दवाखाने तातडीने सुरू करावे.
२) मंजूर केलेल्या भागात कोणती जागा दवाखान्याकरीता अधिग्रहीत केली याची यादी जाहीर करावी.
३) प्रत्येकी १५ हजार लोकसंख्याला एक दवाखाना यानुसार आम्ही सुचवलेल्या भागात दवाखाने मंजूर करावे.
४) जर महानगरपालीका प्रशासनाला दवाखाने सुरू करणे शक्य नसल्यास, शहरातील सामाजिक संसस्था, जिल्हा रुग्णालय, जीएमसी यांना निधीसह दवाखाने चालविण्यास द्यावे.
५) निवड झालेल्या आरोग्य सेवक व पारीचारीकांना तातडीने कामावर रुजू करून घ्यावे.
महागाईच्या कळात गोरगरीब जनतेकरीता शासनाने जाहीर केलेले दवाखाने तातडीने सुरू करून गरजु रूग्णांनात्याचा लाभ मिळू द्यावा.
निवेदन देताना यांची होती उपस्थिती !
ॲड. जयप्रकाश बाविस्कर (मनसे नेते),जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे,महानगर अध्यक्ष विनोद शिंदे,उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे, ललित शर्मा, सतीश सैंदाणे, चेतन पवार, मनविसे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, श्रीकृष्ण मेंगडे, संतोष पाटील, प्रकाश जोशी, विकास पाथरे, प्रकाश बाविस्कर, राजू डोंगरे, यश कुमावत उपस्थित होते.