TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पॉलिसीसाठी कागदपत्र दिले अन् परस्पर जामीनदार केले

श्रीराम चिट्स फंड कंपनीतील मॅनेजरसह एजंटविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा !

vijay waghmare by vijay waghmare
April 25, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पॉलिसीच्या नावाखाली श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीच्या एजंटने कागदपत्रे घेतली. मात्र त्या कागदपत्रांकद्वारे यावल येथील मेडीकल व्यावसायीक प्रशांत अशोक कासार (वय ४५, रा. मेन रोड यावल) यांना जळगावतील मोमीन शेख तोसिफ शेख कामील याला जामीनदार म्हणून लावले. त्यानंतर व्यावसायीकाच्या खात्यातून मोमीन शेख याच्या जामीनाचे पैसे कपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दि. २४ रोजी रामानंद नगर पोलीसात श्रीराम चिट्स फंड कंपनीतील मॅनेजर विवेक बिरे यांच्यासह एजंट मुकेश पाटील (रा. रचना कॉलनी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल येथील मेडीकल व्यावसायीक प्रशांत अशोक कासार यांची त्यांचा गावातील मित्राच्या माध्यमातून श्रीराम लाईफ इन्शोरन्स कंपनीचे एजंट मुकेश पाटील यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर दि. ३१ मार्च २०२३ रोजी व दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी लाईफ पॉलीसीकरीता कासार यांनी एजंट मुकेश पाटील यांना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आधारकार्ड, पॅनकार्ड व आयटी रिटर्नसह इतर कागदपत्रे स्वाक्षरी करुन दिले होते. त्यानंतर मुकेश पाटील यांच्याकडून श्रीराम चिटफंट (भिशी) कडून दि. १९ एप्रिल रोजी १५ लाख व दि. २१ फेब्रुवारी रोजी ५ लाख अशा दोन चिटफंड करीता त्यांनी पुन्हा सर्व कागदपत्रे दिले होते. श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीची दि. २१ फे ब्रुवारी रोजी प्रशांत कासार यांना नोटीस मिळाली. त्यामध्ये मोमीन शेख तौसिफ शेख कामील याला याला चिटफंड (भिशी) करीता जामीनदार केले असून त्याने पैसे न भरल्यामुळे त्यांना श्रीराम फायनान्स यांना पैसे भरावे लागतील असे समजले.

READ ALSO

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

मॅनेजरने जामीनाची रक्कम केली कपात
जामीनदार राहण्यासाठी कधीही चिट्स फंडच्या कार्यालयात गेलेलो नसतांना, तसेच आपली परवानगी नसतांना मॅनेजर बिरे यांनी कोणतीही पडताळणी न करता ओळखत नसलेल्या मोमीन शेख याला जामीनदार दाखविले. त्यानंतर दि. २९ मएर्च रोजी कासार यांच्या पाच लाख रुपयाच्या चिट्सफंडमधून मोमीन शेख याच्या जामीनाची १ लाख ७४ हजार १८ रुपयांची रक्कम कपात करुन उर्वरीत रक्कम कासार यांच्या खात्या वर्ग केली.

कधीही न भेटलेल्या व्यक्तीला केले परस्पर जामीनदार
ज्या मोमीन शेख याला आपण ओळखत नाही, कधीही भेटलेलो नाही त्याला जामीनदार राहिलेलो नाही. त्यामुळे कासार हे शहरातील ओंकारेश्वर मंदिराजवळील श्रीराम चिट्स फंडच्या ऑफिसमध्ये जावून त्यांनी मॅनेजर विवेक बिरे यांना भेटले, मात्र त्यांनी तुम्ही मोमीन शेखला जामीनदार आहात, तुम्हाला पैसे भरावे लागतील असे सांगितले.

एजंटला दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर
जामीनदाराची परस्पर रक्कम कपात केल्यामुळे प्रशांत कासार यांनी दि. २३ मार्च रोजी तक्रार अर्ज दिला होता, त्याची चौकशीझाल्यानंतर दि. २४ एप्रिल रोजी त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार एजंटला विश्वासाने दिलेली कागदपत्रे मॅनेजरने परस्पर वापरुन मोमीन शेख याला जामीनदार केले. तसेच त्यांच्या खात्यातून १ लाख ७४ हजार रुपये कपात करुन त्यांनी फसवणुक केली. याप्रकरणी श्रीराम चिट्स फंड कंपनीचे मॅनेजर विवेक बिरे (रा. जळगाव), एजंट मुकेश पाटील (रा. रचना कॉलनी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
Next Post

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव येथे ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने ट्रॉली उलटून दोन मजूर जागीच ठार

March 7, 2021

‘शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार’ मिळवण्यासाठी शासनाची फसवणूक ; जळगावात ९ जणांविरुद्ध गुन्हा !

November 22, 2022

चाळीसगावात अल्पवयीन मुलगी अत्याचारानंतर गर्भवती !

January 23, 2021

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर !

September 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group