अमळनेर (प्रतिनिधी) येथील विद्याविहार कॉलनीतील रहिवासी तथा गं.स. हायस्कुल मधील उपशिक्षक रोहित श्रावण तेले यांनी त्यांची कन्या मोक्षदाचा रविवार रोजी पहिला वाढदिवस गरिबांच्या व वंचितांच्या सानिध्यात साजरा केला. यावेळी वर्णेश्वर मंदिर परिसरात वंचितांना अन्नदान केले.
कोरोनाच्या कठीण काळात अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने एक वेळचे अन्न सुद्धा मिळणे शक्य होत नाही तरी या सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन तेले परिवाराने कन्येचा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता वर्णेश्वर मंदिर परिसरातील गरीब वस्तीत अन्नाचे पाकीट व गोड पदार्थ देऊन एक वेळच्या जेवणाची भुक भागविली. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न तेले कुटुंबाने केला. यावेळी रोहित तेले, लक्ष्मीकांत अहिरे, राहुल बहिरम, आर.जे. पाटील आदी उपस्थित होते.