नशिराबाद (सुनिल महाजन) गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतातील वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून वीज बिल भरण्यास विरोध नाही, मात्र चुकीचे वीजबिल आकारू नका, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
यासंदर्भात भाजप पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत निवेदन दिले व शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवा, अशी मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, तांत्रिक कारण दाखवत डीपी वर्षभर आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे चार महिने शेतकऱ्यांना वीज पंप चालविण्याची आवश्यकता भासली नाही. तरीदेखील अव्वाच्या सव्या वीज बिल पाठवून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला. यासंदर्भात तोडगा काढून शेतकरी व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समन्वय बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला. वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजप शहराध्यक्ष प्रदीप बोडरे, भाजयुमो अध्यक्ष किरण पाटील, ललित ब-हाटे, डॉ. पंकज इंगळे, जितेंद्र महाजन, सचिन महाजन, ॲड. प्रदीप देशपांडे, प्रशांत पाटील, दिलीप पाटील, विजय सरोदे, चंद्रकांत पाटील, आत्माराम शिरोळे, हेमंत नेहते, खेमचंद नारखेडे, दीपक सोनवणे, प्रवीण पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
















