पाळधी ( प्रतिनिधी ) – “आई – वडिलांना कधीच विसरू नका. मुला-मुलींनी असं नाव कमवा की तुमच्यामुळे आई-वडील ओळखले गेले पाहिजेत.ज्या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेत असाल त्यात झोकून द्या. नेहमी आई-वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि संस्कारांचे मूल्य जपा. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं अतूट असतं. गुरुचं आशीर्वाद आणि पालकांचं संस्कार हेच यशाचं खरं रहस्य असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*
धरणगाव तालुक्यातील सुमारे 270 गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव समारंभ पाळधी येथे उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते डॉ. विनोद बाबर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात दहावी आणि बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
आई-वडील हेच खरे दैवत; वेळेचा सन्मान करा आणि व्यसनांपासून दूर राहा- व्याख्याते डॉ. विनोद बाबर
या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना डॉ. बाबर म्हणाले, यश मिळवायचं असेल तर सर्वात आधी वेळेचा सन्मान करा. कोणत्याही व्यक्तीला दिलेली कौतुकाची थाप ही लाख मोलाची असते; तीच भविष्यात उज्वल यशाची वाट तयार करते.आजचा तरुण दिवसातून सहा-सहा तास मोबाईलमध्ये रमतो. पण मोबाईल हा साधन आहे, स्वामी नाही. त्याचं व्यसन भविष्यातील प्रगती थांबवू शकतं. म्हणूनच वेळेचा योग्य उपयोग करा आणि मोबाईलला मर्यादा घाला. डॉ. बाबर यांनी अनेक जिवंत उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना सजग राहण्याचा संदेश दिला. “आई-वडील हेच खरे दैवत आहेत. त्यांनी गरिबीतून तुम्हाला उभं केलं, त्यामुळे त्यांची गरिबी नव्हे तर श्रीमंती करा. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच तुमचं सर्वोच्च यश आहे, संकटे कितीही आली तरी मागे हटू नका, कारण संघर्ष हीच यशाची पायरी आहे. ताण घेऊ नका, नेहमी आनंदात राहा. सकारात्मक संगतीचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले, “या वयात सावध रहा; कारण या वयात जर बॅलन्स गेला तर आयुष्याचाही बॅलन्स बिघडतो. म्हणून योग्य मित्र, योग्य विचार आणि योग्य दिशा निवडा. असे प्रेरणादायी विचार सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉ. विनोद बाबर यांनी मांडले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांनी भविष्यातही कष्ट, जिद्द व चिकाटी ठेवूनयश संपादन करण्याचे आवाहन करत कार्यक्रमाची सविस्तर माहिती विशद केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य अजिंक्य जोशी व प्रा. भूषण पाटील यांनी केले. तर आभाr नरेंद्र मांडगे यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
या समारंभाप्रसंगी तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, कार्यक्रमाच्या आयोजक तथा जि.प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, चेअरमन विक्रम (विक्की) पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण मुकुंदराव नन्नवरे उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील मार्केट कमिटीचे चेअरमन प्रेमराज पाटील, कैलास चौधरी, माजी चेअरमन प्रमोद पाटील, जळगाव पं.स.चे माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, शिरीष बयास, दूध संघाचे रमेश आप्पा पाटील, साहेबराव वराडे, सरपंच जितू पाटील, मंगलाना पाटील शेतकी संघाचे अध्यक्ष गजानन पाटील, राजू पाटील, गोपाल जीभाऊ, स्वप्निल परदेशी भैया मराठे, गणेश अधिकारी श्री तडवी यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
	    	
 
















