जळगाव (प्रतिनिधी) – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते सामाजिक न्यायाचे अधिष्ठान होते. बाबासाहेबांच्या स्मृती फक्त पोस्टरपुरत्या राहू नयेत. त्यांच्या तत्वज्ञानावर आधारलेली कृती हीच खरी आदरांजली ठरेल. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे केवळ कायदास्त्र नाही, तर सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचं जीवनदर्शन आहे. “बाबासाहेबांनी दिलेल्या समतेच्या मार्गानेच समाजाचा खरा विकास शक्य आहे. असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
सुरुवातीला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. राजुमामा भोळे व मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. प्रास्ताविक उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिचंद्र सोनवणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहसचिव तृशाल सोनवणे यांनी मानले. जयंती उत्सव समिती मार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आ.राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी , मनापा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, विधितज्ञ राजेश झाल्टे, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, अनिल अडकमोल, मुकुंदराव सपकाळे, माजीं महापौर ललित कोल्हे, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, सतीश गायकवाड, भारती रंधे, नीलू इंगळे, संगीता तायडे, राधेभाऊ शिरसाठ, सचिन सरकटे, इत्यादी उपस्थित होते. जळगांव तहसीलदार , तसेच अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, शहर अभियंता मनीष अमृतकर, अँड राजेश झाल्टे, अँड अभिजित रंधे, सचिन धांडे, दिलीप सपकाळे यांच्यासह विविध पक्षांचे व संस्थांचे पदाधिकारी, भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.