मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलेल्या अहवाना नुसार कृषी कायदाबाबतची माहिती सर्वसामान्यांना व्हावी म्हणून डॉ. नितु पाटील यांनी तयार केलेले औषध पत्रके अतिशय उपयुक्त असल्याचे नमूद करत माजी जलसंपदामंत्री आ. गिरीश महाजन यांनी त्यांचे कौतुक केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील कार्यक्रमात बोलत होते.
वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे दोन दिवसीय निवासी प्रमुख पदाधिकारी राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर हे मुंबई ला रामभाऊ म्हाळगी याठिकाणी सुरू असून त्यात सदर औषधपत्रकाचे अनावरण करण्यात आले. डॉ. नितु पाटील हे वरणगाव जिल्हा जळगाव मधील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ असून विविध सामाजिक उपक्रमांसाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. रुग्णांना तपासणी पेपरवर औषधी लिहून दिल्यावर शक्यतो कागदाची दुसरी बाजू ही कोरीच राहते, हे लक्षात ठेवून त्यावर केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर मंत्री यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन छापून येणाऱ्या सर्व रुग्णांना त्याविषयी माहिती दिली जात आहे. असा हा अभिनव उपक्रम राबवणारे डॉ. नितु पाटील हे आमचे सक्रिय एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, याचा आम्हांला अभिमान आहे. यावेळी डॉ. नितु पाटील यांच्या अभिनव औषधी पत्रकाचे अनावरण माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी आ. गिरीश महाजन यांनी केले. यावेळी आमदार संजय केळकर, वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. विंकी रुगवानी, डॉ. अनुप मरार, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. बाळासाहेब हरपाळे, डॉ. श्याम पोटदुखे, डॉ. स्वप्नील मंत्री आदी मंडळी उपस्थित होती.
याप्रसंगी आ. गिरीश महाजन यांनी डॉ. नितु पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले, ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. त्याबद्दल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणि शेतकामगारांना माहिती व्हावी, त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा, या साठी प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी झटून प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले होते आणि त्याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सह संयोजक डॉ. नितु पाटील यांनी त्यांच्या कृती द्वारे दिला आहे.
डॉ. नितु पाटील यांनी याआधीही जलसंवर्धन, अवयव दान, एकही फुलराणी जळणार नाही या विषयांवर याच प्रकारे जनजागृती केली आहे, आता शेती विधेयकाबद्दल केलेली कार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी असून नक्किच इतरांनी त्यांच्या कार्याचे अनुकरण करावे. असे आवाहन माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी आ. गिरीश महाजन यांनी याप्रसंगी केले.