धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील पाटोदा येथील प्रसिद्ध माजी सरपंच, व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांची डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन दिलीपराव पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
भास्करराव पेरेपाटील यांच्या पाटोदा या गावी जाऊन डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन दिलीपराव पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. तसेच गावाच्या विकासाबाबत माहिती घेत हेडगेवार नगर ग्रामपंचायतचा विकास कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन घेतले. यावेळी आपल्या गावाचा विकास आपणच करु शकतो. त्यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. पिण्याचे पाणी शुद्ध असले पाहिजे, पावसाच्या व सांडपाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, गाव व परिसरात फळझाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे. सरपंच-उपसरपंच यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे व पारदर्शक पद्धतीने गावाचा कारभार केल्यास गावातील लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात,असे अनमोल मार्गदर्शन व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांच्याकडून मिळाल्याचे डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटील यांनी सांगितले.