जळगाव (प्रतिनिधी) आपल्या ऍक्सऑन ब्रेन हॉस्पिटलमध्ये खान्देशात प्रथमच फ्लोडायव्हर्टर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा दावा डॉ. निलेश किंनगे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. या शस्त्रक्रियेला साधारण ७ ते ८ लाख खर्च आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पाचोरा येथील वनराज समाधान भोई (वय ३८) यांना १४ ऑगस्ट रोजी अचानक पणे डोकेदुखी आणि चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. त्यामुळे तात्काळ त्यांना डॉ. निलेश किंनगे यांच्या रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. किनगे यांनी तात्काळ रुग्णाचा सि.टी. स्कॅन करण्यास सांगितले. सि.टी. स्कॅन केल्यानंतर रुग्णाच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेला दिसून आला. त्यानंतर यांनी रुग्णाच्या मेंदूची अँजिओग्राफी केली असता त्यामध्ये रुग्णाच्या मेंदूमध्ये व्हाइडनेक अनुरीझम आढळला त्यातून रक्तस्त्राव होऊन रुग्णाला लकवा झाला होता. डॉ. निलेश किंनगे यांनी रुग्णाच्या मेंदूमधील धमनी फुग्याच्या आकारानुसार फ्लोडायव्हर्टर पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण केली, असे किनगे यांनी सांगितले.