भुसावळ (प्रतिनिधी) येथील विश्वनाथ हॉस्पिटलचे डॉ.विनायक महाजन आणि निदान लँबोरेटरीचे डॉ.राजेंद्र फिरके यांची संपूर्ण भारताच्या केंद्रीय आय.एम.एच्या ‘कौन्सिल सदस्य’पदी निवड झाली आहे.
डॉ.विनायक महाजन हे भुसावळ आय.एम.ए चे मागील काळात सचिव होते. त्याकाळात झालेल्या वैद्यकीय कार्यामुळे त्यांना “महाराष्ट्र राज्य स्तरीय प्रथम उत्कृष्ट सचिव” म्हणून सत्कार झाला होता.डॉ.राजेंद्र फिरके हे देखील भुसावळ आय.एम.ए चे सचिव होते आणि त्यांचा पण “उत्कृष्ट सचिव” म्हणून सत्कार झाला होता. वैद्यकीय क्षेत्रांतील समस्या केंद्रीय स्तरावर मांडण्याची संधी यामुळे उपलब्ध झाली आहे,असे मत डॉक्टर महाजन यांनी मांडले. केंद्रीय आय.एम.ए वर भुसावळ मधील डॉक्टरांची नियुक्ती झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्हा वैद्यकीय क्षेत्रांतील तमाम नागरिकांनी त्यांचे याबाबत कौतुक आणि अभिनंदन केले आहे.