जळगाव (प्रतिनिधी) वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जळगाव जिल्हा समन्वयकपदी डॉ. मोईज देशपांडे याची नियुक्ती करण्यात आली असून राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी स्वतः डॉ मोइज देशपांडे यांचे वैद्यकिय क्षेत्रातील योगदान बघता त्यांचे नियुक्ती पत्र देऊन गौरव केला. नियुक्तीबद्दल वंदनीय बाळासाहेब ठाकरे, वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे शिवसेना महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी शुभेच्छा दिल्या.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष- बिगर राजकीय संस्था
वैद्यकिय मदत कक्ष हे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची पूर्णपणे बिगर राजकीय संस्था असून यामध्ये वैद्यकिय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणारे कोणत्याही समाजाचे आणि कोणत्याही पक्षाचे स्वयंसेवक भाग घेऊ शकतात, तसेच जळगाव जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित तक्रारींसाठी गरजू रुग्णांसाठी 7620008080 हेल्पलाईन नबर सुरू करण्यात आला आहे. अशी माहिती डॉ.देशपांडे यांनी मध्यामाशी बोलतांना दिली.
या निवडी बद्दल कक्षाचे जळगां जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी, शिवसेना नगरसेवक गणेश सोनवणे, जिल्हा उपसंवयक महादेव काळे, भावेश धाके, शेखर कोल्हे, मग्नेक फाउंडेशनचे शाकीर शेख, योगेश मस्के तसेच वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांनी अभिनंदन केले.