कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील डॉ, नुरुद्दीन मुल्लाजी यांना रायबा बहुतेशीय संस्था धुळे यांच्या वतीने माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात शिक्षकांना शिक्षक रत्न व समाजसेवकांना समाज रत्न समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन माजी आमदार शरद पाटील, मानव अधिकार सुरक्षा परिषद फॉर्म के नॅशनल डायरेक्टर जनरल गोरख देव,रे प्रा, ए.एस. गांगुर्डे, मौलाना आझाद विचार मंच जिल्हा संघटक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव अधिकार सुरक्षा परिषद फार्मचे नॅशनल डायरेक्टर गोरख देवरे हे होते.
रायबा बहुउद्देशीय संस्था धुळेचे अध्यक्ष ॲड.राकेश पाटील जिल्हा निसर्ग मित्र समितीचे संघटक ॲड. राजेंद्र तरवाडकर,प्रकाश पाटकरी, कार्यक्रम अधिकारी प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शिक्षक वृंद समाजसेवक तथा पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आले.














