धरणगाव (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू या भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल आदिवासी समाज बांधवांतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.
देवगिरी कल्याण आश्रम आणि आदिवासी समाज बांधवांतर्फे धरणगावातील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसंघाचे स्वयंसेवक व देवगिरी कल्याण आश्रमचे स्वयंसेवक मोठ्या संख्यने उपस्थित होते.












