हिंगोली (वृत्तसंस्था) दारुड्या मुलाने वडिलांचे हातपाय बांधून त्यांच्यासमोरच आपल्या वृद्ध आईवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दरम्यान, कळमनुरी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत नरपशु मुलाला अटक केली आहे.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील एका गावातील एका मुलाला दारु पिण्याची सवय होती. दारू पिऊन तो आपल्या आई-वडिलांना रोज त्रास द्यायचा. रविवारी रात्रीच्या सुमारास नरपशू मुलगा नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याचे आई-वडील झोपलेले होते. घरात आल्यावर त्याने आई-वडीलांना उठवत त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने भांडण सुरु केले. एवढंच नाहीत तर दारुसाठी पैसे देत नसल्याने नरपशू मुलाला खूपच संताप आला. त्यामुळे त्याने आपल्या वडिलांचे हातपाय बांधले. तसेच त्यांच्यासमोरच स्वतःच्या 54 वर्षांच्या आईवर अत्याचार केले.
पोटचा मुलगाच आपल्या आईवर अत्याचार करत असल्याचे पाहून वडिलांनी जोरजोरात आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. त्यानंतर नरपशू मुलाने वडिलांना मारहाण करु लागला. दारूच्या नशेत त्याला कसलेही भान राहिले नव्हते. भेदरलेल्या पती-पत्नींने सकाळी गावातील ग्रामस्थांना रात्रीचा कटू प्रसंग सांगितला. त्यानंतर ग्रामस्थांनी कळमनुरी पोलीसात याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पिडीत आईच्या तक्रारीवरून आरोपी नरपशू मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ अटक केली. दरम्यान, नराधम मुलाने दारूच्या नशेत जन्मदात्या आईवरच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर समाजमन सुन्न झाले आहे.
















