भुसावळ (प्रतिनिधी) येथिल आयुध निर्माणी भुसावलचे कर्मचारी (दि. २० ऑक्टोबर) पासुन देशव्यापी अनिश्चित कालिन संपावर जात आहे. स्थानिक संयुक्त संघर्ष समितीची संप यशस्वी करण्यासाठी संपुर्ण तयारी झाली आहे. आज संपाबाबत पोलिस प्रशासनाने स्थितीचा आढावा घेतला.
भुसावळचे डीवायएसपी कुमार चिंथा यांनी स्वा.आयुध निर्माणी परिसरात जाऊन संपाचा आढावा घेतला. आयुध निर्माणी निरिक्षण भवनात युनियन – संयुक्त समिति चे पदाधिकां-यासोबत चर्चा विमर्श केला. संप शांतता पुर्वक करण्याचे आवाहन केले. कर्मचारी प्रतिनिधींनी हि संपात पोलिस प्रशनासनास सहयोग व शांतीपूर्ण करण्याचे आश्वासन दिले. सुरवातीला संयुक्त संघर्ष समिति तर्फे संयोजक दिनेश राजगिरे यांनी मा. डीवायएसपी श्री कुमार चिंथा यांचा भुसावळ पदभार स्वीकारण्यासाठी पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला. या प्रसंगी बाजार पेठ चे पोलिस निरीक्षक व शहर पोलीस चे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे सह स्टाफ प्रमोद पाटिल, बोदोडे यांचे सह संयुक्त समिति चे संयोजक दिनेश राजगिरे, दिपक भिडे, एम एस राऊत, किशोर चौधरी, लक्ष्मण वाघ, कैलास राजपूत उपस्थित होते.