मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ajit Pawar And Devendra Fadanvis) या दोघांचा २३ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेला शपतविधी सोहळा ही शरद पवारांची खेळी असू शकते, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केल्यानंतर (Jyant Patil) राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शपथविधीची खेळी !
जयंत पाटील म्हणाले, मला वाटत नाही की अजित पवार भुलले असतील. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली एखादी खेळी असू शकते. अजित पवारांनी त्यावेळी जी विधाने केली त्याला फार महत्त्व आहे, असे मला वाटत नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री बनून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काम केले. स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी फुटली नाही. शिवसेनेचेच आमदार आमदार गेले म्हणून सरकार कोसळले. राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली हे आपल्याला नाकारता येणार नाही. प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
दरम्यान, 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.