नाशिक (वृत्तसंस्था) राज्यात जे काही कांड झालं त्यामागे ईडी असून अडीच वर्षे आता ईडीच्या कार्यालयाला कुलूप लावा, कारण आता तुमचं सरकार आलं आहे असा टोला छगन भुजबळांनी लगावला. प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव म्हणाले असतील, आता दिल्लीला गेलो आणि सुटलो रे बाबा असंही भुजबळ म्हणाले.
नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अडीच वर्षे आता ईडीच्या कार्यालयाला कुलूप लावा, कारण आता तुमचं सरकार आलं आहे. राज्यात जे काही कांड झालं, सत्तांतर झालं त्यामागे ईडी आहे. महाराष्ट्र सदनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करुन मला जेलमध्ये टाकण्यात आलं. पण त्याविरोधात कोणताही पुरावा नव्हता. आता आपल्यातल्या काही मंत्र्यांना ईडीच्या नोटीसा आल्या होत्या. सरनाईक आणि यामिनी जाधव म्हणाल्या, आम्ही दिल्लीला गेलो, आता सुटलो, आमच्या केसेस माफ झाल्या. आमच्यावर आरोप करताय, पण मला या आरोपांचे आता काहीही वाटत नाही असं म्हणज छगन भुजबळ यांनी शायरीच्या माध्यमातून आपली भावना मांडली. ते म्हणाले की, “बडी से बडी हस्ती मिट गयी हमे मिटाने मे, तुम चाहे कितनी भी कोशिश करलो, तुम्हारी उम्र बित जायेगी हमे मिटाने मे.