TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून आठ गंभीर गुन्ह्याची उकल; एसपी महेश्वर रेड्डी यांची माहिती

जिल्हा पोलीस दल व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या आठ गुन्ह्यांची उकल करून संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची उपस्थिती होती.

पारोळ्यात पैशांची बँग लांबविणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपीला अटक
पारोळा गावातील एसबीआय बँकेसमोर पैशांची बॅग लांबवणारे टोळी पुन्हा सक्रिय झाले असून त्याच परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील व पोलीस नाईक भगवान पाटील यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, पोलीस नाईक भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील आणि प्रमोद ठाकूर या पथकाने सापळा रचून पारोळा शहरातून संशयित आरोपी बसंत बनवारीलाल शिसोदिया याला अटक केली. त्याच्याकडून ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड मिळून आली. दरम्यान त्याने दोन दिवसांपूर्वी पारोळा शहरातील एसबीआय बँक परिसरात त्याच्यासाठी रिशी सिंगदर सिसोदिया व विशाल उर्फ मोगली सिसोदिया दोन्ही रा.गूलखोडी ता. पाचोर जिल्हा राजगढ यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली आहे.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

वरणगावात दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतूससह संशयिताला अटक
वरणगाव शहरातील आंबेडकर नगरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या हरीश उर्फ हर्ष राहुल उजलेकर ( वय-१९ रा. आंबेडकर नगर, वरणगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक ४० हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, उदय कापडणे, रवींद्र चौधरी यांनी केली. पुढील कारवाईसाठी त्याला वरणगाव पोलिसांचा ताब्यात देण्यात आले.

महागड्या गाड्या कमी पैशांत विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जळगावातून अटक
अजिंठाचौफुली ते आकाशवाणीचौक परिसरात महागड्या गाड्या संशयास्पद फिरत होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनांच्या हालचालीवर लक्ष ठेवून कारवाई केली आहे. यात १२ लाख रुपये किमतीची हुंडाई क्रेटा, १५ लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची हॅरियर आणि ४ लाख रुपये किमतीची मारुती बनेलो अशा ३ गाड्या जप्त केले आहे. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, कॉन्स्टेबल विनोद पाटील, गजानन देशमुख, मुरलीधर धनगर, संदीप चव्हाण, ईश्वर पाटील, प्रदीप चौरे, दीपक चौधरी यांनी कारवाई करत संशयित आरोपी मजहर रशीद पिंजारी (वय-४३, रा. सलार नगर, जळगाव) यांच्याकडून या तीनही वाहने जप्त केले आ. या तीन वाहनांवर बनावट नंबर प्लेट लावून महागडी गाडी कमी किमतीत विक्री करत असल्याचे निष्पन्नात आले. दरम्यान यातील दोन गाड्यांच्या चोरीप्रकरणी दिल्ली येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

अमळनेर शहरात ठगबाजी करून सोन्याचे दागिने लांबविणारा संशयित जेरबंद
अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठगबाजी करून सोन्याची अंगठी चोरून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दिगंबर कौतिक न्हावी उर्फ मानकर याला गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोहेकॉ दीपक माळी, रवींद्र पाटील यांनी जळगाव शहरातील आसोदा रोडवरील हरिओम नगरातील बोर्डाजवळ अटक करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांची सोन्याची लगड व अंगठी जप्त केले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दहा चाकी मालट्रक एलसीबीकडून मध्यप्रदेशातून जप्त
फैजपूर पोलीस ठाण्यात मालट्रक (एमएच १९ झेडए ५१८१) चोरी झाल्याच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रक हा मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सुभाटी गावाजवळील खलटाका थाना पोलीस चौकीत ट्रक जमा असल्याचे मिळून आले. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ संदीप पाटील, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, प्रवीण मांडोळे, बबन पाटील, महेश सोमवंशी यांनी प्रक्र क्रमांक (एमएच १९ झेडए ५१८१) हा गुन्हा कामी जप्त केला आहे

सराईत दुचाकी व सायकल चोरी करणारे २ सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी आणि सायकलींची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ दुचाकी आणि १९ सायकली जप्त केले आहे. याप्रकरणी भूषण जगन्नाथ माळी वय-४० आणि विशाल विश्वनाथ माळी वय-२८ दोन्ही रा. वरणगाव ता.भुसावळ यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ५ लाख ८४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघांना पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भूषण शेलार, दीपक चौधरी यांनी केले.

रस्त्यावर लुटमार करणारे तिघे पोलीसांच्या ताब्यात; मुद्देमाल जप्त
विक्री केलेल्या मालाची रक्कम घेऊन दुचाकीने घरी परतत असतांना यावल ते फैजपूर रस्त्यावर दुचाकी आडवून दोन जणांनी धाक दाखवत सोबतची ३९ हजार ७०० रूपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी फरदीन कबीर पटेल वय-२४, रा. आयेशा नगर यावल, सोहेल रुबाब पटेल वय-२३ रा. विरार नगर, यावल आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेली रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई फैजपूर पोलीस स्टेशनचे सपोनि हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, विनोद गाभणे, स.फौ. विजय चौधरी, पोहेकॉ राहुल नावकर, स.फौ.असलम खान यांनी केली आहे. दरम्यान पोलीसांनी केलेल्या कारवाईचे कौतूक करत पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी कर्मचाऱ्यांना रिवार्ड देवून अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

अंडाभुर्जी विक्रेत्याकडून तरूणाच्या डोक्यात टाकला लोखंडी तवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू ; मृतांमध्ये पती-पत्नीसह मुलाचा समावेश !

June 18, 2024

विकासात्मक कामे लवकर पूर्ण करुन नागरीकांना लाभ मिळवून द्या- खा.रक्षाताई खडसे

October 5, 2020

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : ८६ व्या दिवशी ३१३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल !

February 24, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 20 ऑक्टोबर ते शनिवार 26 ऑक्टोबर 2024 !

October 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group