बोदवड (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात आवाज उठविला म्हणून मला ‘ईडी’ माध्यमातून त्रास दिला जात असल्याची घणाघाती टीका माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे. ते आज बोदवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी खडसे म्हणाले की, माझे बापजादे सधन होते. परंतू त्याचे वडील तर शिक्षक होते. आमच्याकडे आधीपासून प्रॉपर्टी होती. मात्र त्याने बाराशे कोटी रूपयांची प्रॉपर्टी कशी जमवली ?. माझे बापजादे श्रीमंत होते. त्यांची मोठी शेतजमीन आणि वाडे होते. परंतु त्याचे वडील शिक्षक असतांनाही आज त्याची बाराशे करोडची प्रापर्टी कशी ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्याप्रमाणे एखाद्याचा जीव हा पोपटात असल्याचे म्हटले जाते. याच प्रमाणे त्यांचा जीव हा बीएचआरमध्ये असल्याने आपल्यावर ईडीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी केला.
दरम्यान, खडसे यांची टीका ही आ. गिरीश महाजनांचा उल्लेख न करता होती. परंतू हि टीका थेट महाजनांवर होती, हे खडसे यांच्या बोलण्यात स्पष्ट कळत होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीने कारवाई केली. नोटीस डकवली, अशा अफवा सुरू होत्या. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांची उपस्थिती होती.