नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या संसदेत चक्रव्यूहसंबंधी भाषण दिल्यानंतर माझ्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारीची कारवाई करण्याची तयारी केली आहे, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. मात्र मी ईडीच्या अधिकाऱ्यांची उदार मनाने प्रतीक्षा करीत आहे. चहा व बिस्किट देऊन त्यांचे स्वागत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भल्या पहाटे अचानक ईडी संबंधी ट्विट केले. केंद्र सरकारमधील ‘२ इन १’ यांना माझे चक्रव्यूह संबंधित भाषण चांगले वाटले नाही, हे जगजाहीर आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या विरोधात कारवाईसाठी कंबर कसली आहे. याबाबत मला ईडीच्या अंतर्गत सूत्रांकडून माहिती मिळाल्याचे राहुल म्हणाले. त्यामुळे त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा ईडीच्या कारवाईचा ससेमिरा लागणार असल्याचे बोलले जात आहे.
या संबंधित घटनाक्रमात काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर म्हणाले की, भाजप सरकारद्वारे राजकीय शोषण करण्यासाठी ईडी, सीबीआय व आयकर विभाग यांसारख्या तपास संस्थांचा गैरवापर केला जाण्याचं शक्यता आहे. या मुद्द्यावर चच करण्यासाठी आम्ही लोकसभेत कार्यस्थगन प्रस्तावाची नोटीर दिल्याचे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय बाब अशी की अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभा घेत राहुल गांधी यांनी देशाल अभिमन्यूसारख्या चक्रव्यूहार अडकवल्याचा आरोप कें सरकारवर केला.