जळगाव (प्रतिनिधी) आज रुहते हिलाल कमिटीची सभा मौलाना उस्मान कासमी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून त्यात संपूर्ण भारतात कुठेही चंद्र दर्शन न झाल्याने रमजान ईद ही शुक्रवारी साजरी करण्यात येणार असल्याचा एकमुखी ठराव सर्वा नुमते करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री झालेल्या रुहते हीलाल कमिटीच्या मीटिंगमध्ये इदगह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी प्रस्तावना सादर केला असून सचिव फारुक शेख यांनी याबाबतचा आढावा सादर केला. मौलाना नासिर यांनी ईदच्या चंद्राचे महत्व विशद केले. कारी झाकीर यांनी मार्गदर्शन केले. मौलाना उस्मान यांनी कुराणच्या माध्यमातून ईदचे व चाँद बाबत माहिती दिली. या सभेत जळगाव शहरातील मशिदीचे इमाम व उलमा तसेच ट्रस्टी यांची उपस्थिती होती.
ईदची नमाज घरी अदा करा
शासनाचे आदेश नसल्याने यावर्षी सुद्धा ईदची नमाज आप आपल्या घरी अदा करावी व शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सुद्धा समितीमार्फत करण्यात आलेले आहे.
मीटिंगमध्ये यांची होती उपस्थित
मौलाना नसीर, मुफ्ती इम्रान, मौलाना रेहान, मौलाना वसीम, मौलाना शफी,मौलाना अब्दुल रहीम, कारी झाकीर,मौलाना कोनेन, मौलाना असरार, तसेच ईदगाह ट्रस्टचे सैयद चाँद, अश्फाक बागवान, ताहेर शेख, अनिस शाह, मुकिम शेख, मुश्ताक अली, यांची उपस्थिती होती.