जळगाव (प्रतिनिधी) अलहाज अब्दुल गफ्फार मलिक यांच्या अकस्मात मृत्यूमुळे जळगाव जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यामुळे खासकरून अल्पसंख्यांक समाजात, मुस्लीम ईद गाह व कग्रस्थान ट्रस्ट यामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाल्याचे ट्रस्टचे सचिव फारूक शेख यांनी आपल्या शोक संदेशात म्हंटले आहे.
जळगाव कोविड केअर युनिटच्या माध्यमाने सुद्धा अब्दुल गफ्फार मलिक यांच्या नेतृत्वात काम करीत असताना त्यांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक व धार्मिक अनुभवाचा व्यक्तीशा मला फायदा झाला व माझ्या ज्ञानात भर पडली असे सुद्धा शेख यांनी नमूद केलेले आहे. त्यांच्या जाण्यामुळे अल्पसंख्यांक समाजा पोरका झाला असून अल्लाह त्यांना स्वर्गात जागा देवो, अशी प्रार्थना सुद्धा त्यांनी केलेली आहे.