जळगाव : सेवानिवृत्त टेलिफोन ऑपरेटर एकनाथ रामदास पाटील (वय 75, रा. साळवा, ता. धरणगाव, ह. मु. जळगाव) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकनाथ पाटील हे आजारी होते. आज त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सामाजिक कार्यकर्ते अमित पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगी, मुलगा,सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दि. 28 रोजी दुपारी 3 वाजता राहते घर महाबळ कॉलनी च्या खाली संभाजीनगर चौक (डॉ. राहुल पाटील यांच्या घरासमोर) येथून निघणार असून नेरी नाका समशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.