मुंबई (वृत्तसंस्था) राजकीय आकसापोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे, असे ट्विट शिंदे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेच्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी ही सरकारची आहे, याकडेही शिंदे यांनी या ट्विटमधून लक्ष वेधलेय.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. आसाम सरकारकडून या सगळ्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षिततेसाठी रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर स्थानिक पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांचा आरोप पाहता या आमदारांच्या महाराष्ट्रात राहत असलेल्या कुटुंबीयांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. या आमदारांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही त्यांनी सांगितले. या आमदारांच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. या आमदारांच्या कुटुंबीयांना काही झाल्यास त्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जबाबदार असतील असेही शिंदे यांनी म्हटले.या आमदारांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही त्यांनी सांगितले. या आमदारांच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. या आमदारांच्या कुटुंबीयांना काही झाल्यास त्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जबाबदार असतील असेही शिंदे यांनी म्हटले.