अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) येथील व्यापारी एसोशिएनचे अद्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते उमेश रमेश कासट यांची भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व जिल्ह्याच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नूकतीच निवड घोषित करण्यात आली आहे.
अडावद येथील उमेश रमेश कासट हे व्यापारी बांधवासाठी नेहमीच कार्यतत्पर राहून काम करतात. ते राज्यस्तरीय अँन्टी करप्शन डीव्हीजन कमेटीचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. व्यापारी बांधवासाठी गावातच शाँप अँक्ट परवाना शिबिर आयोजित करणे,आरोग्य शिबिर,क्रिडा स्पर्धासह सामाजिक आणि धार्मिक कार्यात उमेशअण्णा कासट यांचा नेहमीच खारीचा वाटा असतो. त्यांच्या कार्याची चूणूक बघून त्यांची भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व जिल्ह्याच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नूकतीच निवड राज्याचे ग्रामविकास आणि पर्यटनमंत्री ना.गिरिष महाजन यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी नियुक्ती पत्र प्रदान करून केली.
उमेश कासट यांच्या नियुक्तीबद्दल राज्याचे नेते ना.गिरीशभाऊ महाजन, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेषदादा पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. संजयभाऊ सावकारे, आ. मंगेशदादा चव्हाण व जिल्हातील सर्व लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. चोपडा तालुक्यातूनही त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.