नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नुकतेच पाच विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. तसंच यासोबत पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर झाले असून काँग्रेसचा धुव्वा उडालेला दिसला. तसंच या निवडणुकांच्या निकालांवरून हे स्पष्ट होतंय की काँग्रेसला सुधारणांची गरज आहे, असं मत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी झालेल्या ‘काँग्रेस कार्यकारी समिती’च्या बैठकीत व्यक केल आहे.
आपल्याला या गंभीर झटक्यांची नोंद घेणं गरजेचं आहे. या निकालांमुळे आपण केवळ निराश झालो आहोत, असं म्हणणंही कमी ठरेल. हे झटके बसण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या प्रत्येक मुद्यावर विचार-विनिमय करण्यासाठी एका छोट्या समूहाचं करून त्याचा लवकरात लवकर अहवाल घ्यावा असा माझा विचार आहे, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलंय. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलंय, असं ठासून सांगतानाच सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी सोनिया गांधी पुन्हा एकदा केलीय. आरोग्य संकटाशी सामना करताना हरएक संभाव्य सहकार्य करण्याचं आवाहन सोनिया गांधींनी पक्ष कार्यकर्त्यांना केलंय.
‘काँग्रेस पक्ष केरळ आणि आसाममध्ये सद्य सरकारला हटवण्यात अपयशी का ठरला? तसंच बंगालमध्येही काँग्रेसला खातं उघडता आलं नाही? याची कारणमीमांसा करण्याची गरज आहे. या प्रश्नांची उत्तरं काहीतरी नक्कीच शिकवतील. आपण वास्तविकतेचा सामना केला नाही किंवा तथ्य योग्य पद्धतीनं पाहू शकलो नाहीत तर आपण त्यातून काही शिकणार नाही. निवडणुकीचे हे निकाल स्पष्टपणे दर्शवत आहेत की आपल्याला काही गोष्टींत सुधारणा करावी लागेल’, असंही सोनिया गांधी यांनी या बैठकीत म्हटलंय.