जळगाव (प्रतिनिधी) शहरातील डांबर फॅक्ट्रीतुन अज्ञात चोरट्यांनी साडेअकरा हजारांचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, औद्योगीक वसाहत परिसरातील डी-सेक्टर ११ येथील डांबर फॅक्ट्रीतुन साडेअकरा हजारांचे साहित्य चोरीला गेले. सोनाली रमेश महाजन यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे कंपनीतील ११ हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रीक साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महेंद्र सिंग पाटील करत आहेत.